उस्मानाबाद: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.२३) ई-कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्हाधिकारी आर.व्ही.गमे, जिपचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, भाजपा मिडीया विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, अनिल काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, स्त्री रूग्णालयाचे डॉ. राहुल वाघमारे, खंडेराव चौरे, नितीन भोसले, प्रविण पाठक, राहुल काकडे, इंद्रजित देवकते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment