जानाई महिला पतसंस्था देणार १०% लाभांश

Tuesday, September 25, 2018

 केरळ पुरग्रस्तांसाठी २५000 रुपयाच्या मदत.  गीता ठोंबरे यांची माहिती 

लातूर ,ता. २४ (बातमीदार) 
: येथील जानाई महिला गृहलक्ष्मी सहकारी पतसंस्थेला सतत चारवर्ष आॅडीट अ वर्ग प्राप्त झाला व सात लाख पाच हजार रूपये नफा झाला आहे. यावर्षी पतसंस्था आपल्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करणार आहे, अशी माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा गीता ठोंबरे यांनी पतसंस्थेच्या ४ थ्या सर्वसाधारण महासभेत दिली.

पतसंस्था संपुर्ण संगणकीकृत असुन पतसंस्थेने स्वतंत्र स्ट्राॅंगरूम, तिजोरी , लाॅकरची व्यवस्था करून सभासदांसाठी सोने तारण कर्ज उपलब्ध केलेले आहे. आर.टी.जी.एस. व एन ई एफ टी (RTGS, NEFT) ची सोय उपलब्ध करून देणारी जानाई पतसंस्था ही लातूर मधील पहिली पतसंस्था ठरली आहे. लातूर मध्ये सिग्नल कॅंप , मित्रनगर, लाईट कार्यालय हत्ते नगर अशा चार ठिकाणी पतसंस्थेचे वीज बिल भरणा केंद्र चालु आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती ठोंबरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सहकार भारती लातूर जिल्हा उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 

 या पतसंस्थेच्या दीड हजार महिला सभासद आहेत. २८ लाख ३३ हजार भागभांडवल असुन सहा कोटी आकरा लाख च्या ठेवी आहेत. चार कोटी नव्वद लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे.एकुण वार्षिक व्यवहार ११ कोटी २ लाख ८३ हजार आहे. एन.पी.ए. २.९७% अतिरिक्त तरतूद १७ लाख ६६ हजार रुपयाची आहे व गुंतवणुक ८२ लाख ७७ लाख आहे. 

 सामाजिक बांधिलकी जपत केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पतसंस्थेने रू २५ हजाराचा धनादेश महासभेत रा.स्व.जनकल्याण समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष विजय गोठाळकर यांच्या कडे सुपुर्त केला.  व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले.अध्यक्षीय समारोप गीता ठोंबरे यांनी केले. सुत्र संचलन अनुपमा पाटील तर अभार प्रदर्शन अंजली कुलकर्णी  यांनी केले. 

 महासभा यशस्वी करण्यासाठी निलीमा अयाचित , रेखा मार्कंडेय , अनुपमा पाटील, संगीता पवार , रोहीणी मुंढे, सगुणा शिवनगीकर, डाॅ.माधवी निरगुडे , पुजा कांबळे, संपदा दाते, शुभांगी शेटे. निलीमा अयाचित.व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment