लातूर :गेल्या कित्येक वर्षात एक कलमी , एककल्ली राजकारण अनुभवणाऱ्या लातूर जिल्ह्यात सध्या सामान्य जनतेचे म्हणणे ऐकणारे आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणारे नेतृत्व उदयास आले आहे .या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास कामे होऊ लागली आहेत .या कामांनी जनता समाधानी असून त्यामुळे सर्व विकासकामांची चर्चा होऊ लागली आहे .ही चर्चा तर होणारच आहे परंतु यामुळे अनेकांची पोटदुखी वाढली असून त्यांना 'औषध' देण्याची गरज निर्माण झाली आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले .या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या मनमानीला कंटाळलेल्या लातूरकरांनी लोकसभेपासून नगरपंचायती पर्यंत सर्व सत्तास्थाने भाजपाच्या हवाली केली .याची दखल घेत नेतृत्वानेही सत्तेचा वाटा लातूरकरांना दिला .संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपाने युवा नेतृत्वाला मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली .त्यानंतर तर लातूरकरांनी मागे वळून पाहिलेच नाही .संभाजीराव पाटील यांना मंत्रीपद आणि त्यानंतर लातूरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर विकास काय असतो हे लातूरकरांना समजले . विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .यापूर्वी विकास झाला नाही असे नव्हे परंतु विकास कामे करताना सामान्य , गोरगरीब आणि त्यांच्या गरजांचा विचार झाला नव्हता. आता मात्र प्राधान्याने हाच समाज डोळ्यासमोर ठेवून कामे सुरू आहेत .पालकमंत्री निलंगेकर यांची दूरदृष्टी आणि रेणापुर येथील कार्यक्रमात आमदार सुधाकर भालेराव यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पालकमंत्र्यांचे मास्टरमाइंड युवा नेते अरविंद पाटील यांच्या नियोजनातून नियोजनबद्ध विकास होऊ लागला आहे.
प्रत्यंतर निलंगा येथील कार्यक्रमातून आले .संभाजीराव पाटील यांनी निलंगा तालुक्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणला . या निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले .एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणणारा आणि विकास कामे करणारा पालकमंत्री यापूर्वी लातूरला मिळाला नाही अशीही चर्चा होत आहे .निलंगा मतदारसंघासह जिल्ह्यातील इतरही पाच विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा विडा संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उचलला आहे .त्यासाठीच ते रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत .लातूरच्या दुष्काळाची अनेक वर्ष चर्चा झाली परंतु त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत .पालकमंत्र्यांनी मात्र पुढाकार घेऊन इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान जिल्ह्यात राबवले .एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर गणेशोत्सवात गणेश मंडळांनी हे अभियान राबवावे यासोबतच वृक्षारोपण करावे यासाठी ते आग्रही आहेत .या माध्यमातून लातूर जिल्हा जलयुक्त , वनयुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. रेल्वे बोगी कारखान्याच्या निमित्ताने लातूरचा औद्योगिक विकास साधण्यासाठी धडपड सुरू आहे .या कारखान्याच्या माध्यमातून लातूरची बेरोजगारी कमी होणार आहे.
प्रत्येक गाव नव्हे तर प्रत्येक उंबरठ्याचा विकास व्हावा असे त्यांचे धोरण आहे. यासाठी विविध शासकीय योजना राबवून सामान्य, गोरगरीब जनतेचा विकास साधणारा एकमेव व्यक्ती म्हणून पालकमंत्र्यांचे नाव घेतले जात आहे .जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत .केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून पालकमंत्र्यांनी ही कामे खेचून आणली आहेत. पिक विमा, जलयुक्त शिवार यासारख्या असंख्य योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. यामुळेच मागच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवलीच नाही .दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी प्रयत्न होत आहेत आणि यामुळेच विरोधकांची पोटदुखी वाढली आहे .राजकीय क्षेत्रात प्रत्येकाचेच काहीतरी ध्येय ठरलेले असते .याशिवाय असंख्य विचाराचे लोक एकत्र काम करत असतात .यामुळे काही वेळा मतभिन्नता दिसून येते .परंतु असे झाले तर तो नेतृत्वाचा दोष नसतो. ग्रामपंचायत सदस्य ,नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपणही मोठे व्हावे असे वाटते .त्यातून काही प्रकार घडतात
.अनेकदा न्यायालयाचे निर्णय विरोधात जातात परंतु त्याला नेतृत्व जबाबदार नसते .असेच काही प्रकार झाल्यानंतर संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचा उद्योग काही बिनकामाची मंडळी करत आहेत .परंतु हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व विकसित झालेले आहे .नरेंद्र मोदी ,नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व कामाच्या माध्यमातून संपादन केलेला विश्वास तसेच या नेत्यांनी काम करण्याची दिलेली मोकळीक यामुळे संभाजीराव पाटील निलंगेकर हे केवळ लातूर जिल्ह्याचे नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व आहे. यामुळेच नांदेड महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती .आताही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्यावर काही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे .
कर्नाटक निवडणुकीतही त्यांच्याकडे बिदर जिल्ह्याची जबाबदारी होती .दिलेल्या या जबाबदाऱ्या पाहता संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत पक्ष नेतृत्वाला खात्री आहे .त्यामुळे लातूरच्या विकासाला झुकते माप मिळत आहे आणि यामुळेच लातूरच्या विकासाची राज्यात चर्चा होत आहे आणि ती होतच राहणार आहे .ही चर्चा जशी वाढेल त्याच प्रमाणात विरोधकांची पोटदुखीही वाढणार आहे .परंतु यामुळे काहीही फरक पडणार नाही तर उलट संभाजीराजांचे नेतृत्व मोठे होत जाणार आहे..
No comments:
Post a Comment