लातूर : सोमवारी सकाळी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थायी समितीच्या सभापती आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भात याचिका कर्ते दीपक सूळ आणि विजय साबदे यांनी जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भात संपूर्ण प्रक्रिया रद्द करून जो निकाल दिला आहे या वर प्रतिक्रिया देताना लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख दैनिक मराठवाडा नेताशी बोलताना म्हणाले की , लातूर महानगर पालिकेत भाजपचा अंदाधुंद आणि मनमानी कारभार सुरू आहे त्याला न्यायालयाने ही चपराक दिली आहे शासनालाही काही सूचना केलेल्या आहेत सत्ताधाऱ्यांचे मनमानी कारभाराचे हे मूर्तिमंत स्वरूप असून त्याला न्यायालयाने उचलून धरले आहे . या निकालाने आम्ही समाधानी आहोत आता तरी सत्ताधार्यांनी याचा बोध घ्यावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ अमित देशमुख यांनी दिली
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment