लातूर /प्रतिनिधी : लातूर विशाल विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रावसाहेब लकडे तर व्हाईस चेअरमन पदी हणमंत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बी- बियाणे ,खते, विविध औषधी पुरविण्याचे काम या सोसायटीमार्फत केले जाते. माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात या सोसायटीची वाटचाल गतीने झाली .माजी मंत्री दिलीपराव देशमुख ,आ.अमित देशमुख, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी काम करत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे ,शेतकरी कल्याणाचे अनेक निर्णय सोसायटीने घेतलेले आहेत. राज्यातील सेवा सहकारी संस्था डबघाईला येत असताना लातूर विशाल कार्यकारी सोसायटी मात्र आजही क्रमांक एकवर आहे.
या सोसायटीच्या कामकाजावर आणि सोसायटीने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयावर तालुक्यातील शेतकरी खुश आहेत. आजपर्यंत या सोसायटीच्या पदाधिकार्यांच्या निवडी बिनविरोधच झालेल्या आहेत .त्याच पद्धतीने लकडे आणि पवार यांचीही निवड बिनविरोध झाली .दैनिक मराठवाडा नेता परिवाराच्यावतीने चेअरमन रावसाहेब लकडे ,व्हाईस चेअरमन हणमंतराव पवार यांचे अभिनंदन. लकडे आणि पवार यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्यासाठी असेच कामकाज करावे या शुभेच्छा!

No comments:
Post a Comment