राज्य सरकार दिवाळखोरीत आहे का - धनंजय मुंडेंचा सवाल ?

Sunday, September 23, 2018
लाचेच्या स्वरूपात स्टेशनरीची मागणी करण्याची अधिकार्‍यांवर वेळ


बीड दि.22...................... राज्य सरकार दिवाळखोरीत निघाले आहे का ? की, शासकीय कामकाजासाठी लाच म्हणुन स्टेशनरी ची मागणी करण्याइतकी वाईट वेळ अधिकार्‍यांवर यावी असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील भूसंपादन कार्यालयात शासकीय कामकाजासाठी गेलेल्या एका 36 वर्षीय व्यक्तीला तेथील अधिकारी मुरलीधर ठाकरे यांनी शासकीय कामकाजाची कागदपत्रे हवी असतील तर ब्लँक पेपर रीम आणुन द्या अशी मागणी केली. त्यानंतर सदर व्यक्तीने लाचलूचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केल्यानंतर सदर अधिकार्‍याला लाचेच्या रुपात पेपर रीम स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. 

या घटनेवर प्रतिक्रीया व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी एक एक ट्विट करून शासकीय कामकाजासाठी पेपर रीमची मागणी करण्याचा, त्या अधिकार्‍याचा मार्ग चुकला असला तरी या निमित्ताने राज्यातील सरकारची दिवाळखोरी उघड झाली आहे. वित्त आयोगाने आधीच राज्यातील आर्थिक परिस्थितीचे वाभाडे काढले असताना शासकीय कार्यालयांमध्ये स्टेशनरी ही उपलब्ध नसल्याचे चित्र दिसू लागल्याने राज्य दिवाळखोरीतच गेले आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल चंद्रकांत दादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. 

मला राज्यातील अनेक कार्यालयांमधून अधिकारी, कर्मचार्‍यांचे फोन येत असतात त्यात सरकार वाळु चोरीवर नियंत्रण ठेवायला सांगते दुसरीकडे ते नियंत्रण ठेवण्यासाठी लागणार्‍या वाहनातील डीझेलची मात्र सोय करत नाही, शासकीय कार्यालयात साधी स्टेशनरीही उपलब्ध होऊ शकत नाही, अशा व्यथा मांडतात, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment