कळमनुरी / प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी आदिवासी युवक संघातर्फे 24 सप्टेंबर रोजी येथील सामाजिक सभागृह ते तहसील कार्यालय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
आदिवासी जमीन धारकांना कलम 85 नुसार जमिनीचे खाते फोड वाटणी पत्र करणे, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा कृषी क्रांतिवीर मध्ये निधी वाढवून देण्यात यावा, शबर आदिवासी घरकुल योजनेचे हिंगोली जिल्ह्याचे घरकुलांचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे, गायराण गावठाण सर्वे नंबर मध्ये घरकुल बांधकामासाठी मालकीचे हक्क देण्या बाबत झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या सह विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबर रोजी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार वाघमारे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
काही मागण्या आपल्या स्तरावरून सोडवता येतील, परंतु त्यामधील निकष प्रक्रियेतून सोडवले जातील, असे वाघमारे यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ.संतोष टारफे, जि.प.सदस्य डॉ. सतीश पाचपुते, मारुती बेले, कृष्णा पिपरे, शंकर शेळके, संजय काळे, बबन डुकरे, सुधीर बेले, भारत अमले, भारत बोडखे, धनंजय ठाकरे, कौशल्या बेले, नागेश डुकरे, शंकर बोथीकर, लिंबाजी गव्हाळे, धोंडीबा पिराजी, बर्गे किसन,मिरासे केशव, नामदेव धोत्रे, केशव कांबळे, रेणुका ताई खोकले, बालाजी चिवडे, रेखा असोले, भारत बेले, नर्सिंग साबळे, शिवप्रसाद पाचपुते, गुनाजी खोपसे, रुस्तुम पोटे, भीमराव वागतकर, माधव वाघडव, गणेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती.
................................................

No comments:
Post a Comment