नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद वाणिज्य, कला,सायन्स, विधी या चारही महाविद्यालयांनी एकूण ३८ पदक पटकावत दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने सर्व साधारण विजेते पटकावले तर कला शाखेने उपविजेतेपद पटकावले आहे त्यामुळे पुन्हा एकदा लातूर च्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या दयानंद शिक्षण संस्थेला मानाचा तुरा रोवला गेला आहे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सहयोग युवक महोत्सवात दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने १८ पदक पटकावले त्यात १० सुवर्ण पदक,६ सिल्वर,२ कास्यपदक, तर कला शाखेने ४ सांधिक प्रथम पारितोषिक, आणि सांधिक तृतीय क्रमांकाचे ३ पारितोषिक, वयक्तिक ३ पटकावले, आणि सायन्स महाविद्यालयाने सुवर्ण १, रौप्य १, कास्य पदक ३असे एकुण पाच पदक पटकावले तर विधी महाविद्यालयाने ५ पदक पटकविले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी पदक विजेते यांचा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमणजी लाहोटी सचिव रमेशचंद्र बियाणी, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सहसचिव सुरेश जैन, तसेच नियामक मंडळाचे सदस्य विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे, विशाल अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी दयानंद वाणिज्य शाखेचे प्राचार्य डॉ श्रीराम सोळुंके, दयानंद कला शाखेचे प्राचार्य जोगेंद्र सिंह बिसेन, सायन्स महाविद्यालय चे प्राचार्य जयप्रकाश दरगड, विधी शाखेचे प्राचार्य उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यास उपप्राचार्य अशोक शेलगेनवार, डॉ राजाराम पवार, डॉ ब्रिजमोहन दायमा, डॉ अंकुश कुमार चव्हाण, प्रा. आकांशा भांजी, प्रा.मनीषा अष्टेकर, उपप्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, डॉ शिवाजीराव जवळगेकर, नवनाथ भालेराव, व्हॉईस प्रिन्सिपॉल डॉ एस एस बेल्लाळे, डॉ सी एस स्वामी, डॉ मेघा पंडित, जयश्री आजेगावकर आदी उपस्थित होते

No comments:
Post a Comment