सन्मती सेवा संघाच्या वतीने आयोजित जैन पर्युषण महापर्व उत्साहात उत्साहात साजरा

Sunday, September 30, 2018

लातूर, दि . २९ : येथील सन्मती सेवा संघाच्या वतीने लातूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या जैन पर्युषण महापर्वाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणांत झाली. 

पर्युषण महापर्वाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटनेचे लातूर जिल्हा समन्वयक तथा लातूरचे ख्यातनाम सनदी लेखा परीक्षक सुनील कोचेटा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पर्युषण महापर्वाच्या कालावधीत दररोज सकाळी नित्यनैमित्तिक संगीतमय अभिषेक, दशलक्षण पूजा, षोडषाकारण पूजा करण्यात आली. तसेच सायंकाळच्या सत्रात संगीत आरती व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या महापर्वाच्या अनुषंगाने खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्तेही आरती करण्यात आली. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सन्मती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसतिगृह बांधकामासाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या महापर्वाच्या कालावधीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष केयूर कामदार, तेरापंथ सभेचे अध्यक्ष सुरेशचंद्र जैन, श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष कमलसेठ चापसी, सचिव विजय सोळंकी, आदी मान्यवरांच्या होते महाआरती करण्यात आली. 


सन्मती सेवा संघाच्या वतीने पर्युषण महापर्वाचे औचित्य साधून मंगळवार ,दि. २ ऑक्टोबर रोजी अनंतरोट ( महाप्रसाद ) चे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment