कळमनुरी/प्रतिनिधी
खा.सातवांच्या कर्तुत्वाचा वेलु देशभर पोचला असुन, जनसागराच्या उदंड प्रेमाच्या जोरावर मोठी कामगीरी करावी असे अभिष्टचिंतन करत सातवांना किर्तनातुन प्रसिध्द किर्तनकार हभप रामराव महाराज ढोक यांनी शुभेच्छा दिल्या.
कळमनुरीत कै.शंकरराव सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात खा.सातवांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत किर्तनात ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री रजनीताई सातव, खा.राजीव सातव, डॉ.प्रज्ञाताई सातव, आ.संतोष टारफे, कृउबाचे माजी सभापती रामेश्वर शिंदे, नारायण खेडकर, दाजीबा पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, बाबाराव नाईक, सतीश पाचपुते, प्राचार्य बबन पवार, धनंजय पाटील, सुवर्णा गाभणे यांची उपस्थिती होती. यावेळी किर्तनात हभप रामराव महाराज ढोक यांनी वाढदिवस हा शब्दप्रयोगाएैवजी अभिष्टचिंतन असा शब्दप्रयोग करणे गरजेचे असल्याचे सांगत खा.सातव यांच्या प्रेमापोटी हजारोच्या संख्येने नागरीकांनी उपस्थिती लावुन त्यांंच्यावरील प्रेम दर्शविले आहे.
या जनसागरायच्या प्रेमाच्या जोरावर सातवांना उदंड आयुष्य लाभुन त्यांच्या हातुन देशात मोठी कामगीरी व्हावी असा शुभेच्छा रूपी संदेश दिला. किर्तनात अभंग, ओव्यांचे दाखले देत मानवाला मिळालेल्या नरजन्माचा अर्थ समजुन घेऊन त्यांनी सदाचार, सद्भाव जोपासत सामाजीक कार्यासाठी आपला अमुल्यवेळ देत ईश्वरी चिंतन करावे असे आवाहन केले. दरम्यान आ.डॉ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी खा.राजीव सातव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment