विरशैव ककय्या समाज प्रतिष्ठान लातूर यांच्यावतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Sunday, September 9, 2018

लातूर, दि.९ - प्रतिवर्षा प्रमाणे लातूर येथे विरशैव ककय्या समाज प्रतिष्ठानच्यावतीने ककय्या समाजातील वधू वरांचा सामुहिक विवाहचे आयोजन दि. ३० डिसेंबर रोजी गोरज मुहर्तावर सायंकाळी ६.०५ वाजता आय. टी. आय. कॉलेज शिवाजी चौक लातूर येथे आयोजीत करण्यात आले आहे. 

या विवाह सोहळ्यात १०१ जोडपी विवाह बंधनामध्ये पर्दापन करणार्‍या आहेत. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश राज्यातील वर्‍हाडी मंडळी उपस्थित राहणार आहेत. व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यात वधू- वरांना संसार उपयोगी भेट वस्तू दिल्या जातील. सहभागी वधू चे वय १८ वर्षे वरांचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे. ज्या वधू वरांचे लग्न जमले आहे अशांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जांबवंतराव सोनकवडे, मातोश्री निवास इंजिनीयरींग कॉलनी औसा रोड लातूर, व दिगंबर खरटमोल, अण्णाभाऊ साठे चौक लातूर येथे संपर्क करावा असे आवाहन ऍड. जांबुवंतराव सोनकवडे, पंडित कावळे, दिलीप कटके, सचिव गणेश सावळकर, प्रभाकर कोकणे, बालाजी महादेव कावळे, मुंबई शिवलिंग व्हटकर, अप्पाराव कावळे, दिगंबर खरटमोल, सुरेश त्रिमुखे, शंकर इंगळे, निवृत्ती कावळे, खंडेराव सावळकर , निवृत्ती सावळकर, ऍड. बाळासाहेब कटके, नवनाथ कोकणे, केरोजी सोनवणे यांनी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment