नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 'महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, जागावाटपाच्या मुद्द्यावर लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी अंतिम निर्णय घेतील,' अशी माहिती महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दिली.
'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकतीच आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जागावाटपाचा तिढा निकाली काढण्यासाठी राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील,' असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
खरगे यांनी या यात्रेचा पहिला टप्पा ८ सप्टेंबर रोजी संपुष्टात आल्याचे नमूद करत दुसरा टप्पा चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. 'सर्वच काँग्रेस नेते व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. काही ठिकाणी समस्या होत्या. मात्र आता त्या सोडवण्यात आल्या आहेत. सर्वच लोक पक्षाला विजय मिळवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कामाला लागले आहेत,' असे ते म्हणाले. दरम्यान, या वेळी खरगे यांना शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयी छेडले असता त्यांनी सध्या तरी अशी कोणतीही शक्यता दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले..

No comments:
Post a Comment