प्रशिक्षित मनुष्यबळामुळे देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के वाटा हा महाराष्ट्राला - कौशल्य विकास मंत्री निलंगेकर

Friday, September 7, 2018


लातूर,दि. ७:- राज्याचे कामगार कल्याण,कौशल्य विकास,भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा  पालकमंत्री  लातूर संभाजी  पाटील निलंगेकर : भारतात येणार्‍या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही फक्त महाराष्ट्रात होत असून, याचे महत्वाचे कारण म्हणजे राज्यात गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ, आणि उद्योगांसाठी गरजेच्या साधनांची असलेली उपलब्धता आहे. असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित केलेल्या यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलद्वारे ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त, इंडिया आयडियाझ समीटमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ निर्माण करणे या विषयावरील चर्चासत्रात केले.
या चर्चासत्रास राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर,  वेस्ट बंगालचे वित्तमंत्री श्री अमित मित्रा, गुजरातचे ऊर्जा मंत्री श्री सौरभ पटेल, स्टेट ऑफ इंडियानाचे वाणिज्य सचिव श्री जिम स्चेलिंगर, स्टेट ऑफ केंटकीचे मुख्य विदेश नीतीचे श्री एरान पेर्सले व इतर मान्यवर उपस्थित होते. 

इंडिया आयडियाझ समीट हे पहिल्यांदा भारतात होत आहे आणि त्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळाला आहे, यावरून महाराष्ट्र राज्य हे देशात स्पर्धात्मक मनुष्यबळ निर्माण करण्याच्या बाबतीत अग्रेसर असुन, राज्य आशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत आहे, हे यावरूनच स्पष्ट होते. असे गौरव उद्गार काढत, श्री निलंगेकर यांनी महाराष्ट्र राज्यात आशा प्रकारचे समीट घेण्यात आले याबद्दल यूएस इंडिया बिझिनेस कौन्सिलचे त्यांनी स्वागत केले व आभार मानले.

पुढे ते म्हणाले साध्यस्थीती पाहता महाराष्ट्रात दोन संस्था कार्यरत आहेत. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या वेगवेगळया प्रकारे राज्यात कार्यरत आहेत. राज्यात ८०० औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परिषदेमार्फत तयार केला जातो. येणार्‍या उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक अभ्यासक्रम बनविला जात आहे. तसेच मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दिलेल्या उभारी मुळे महाराष्ट्रात आशा प्रकारचे मनुष्यबळ अवघ्या २ वर्षात निर्माण झाले असून त्या मनुष्यबळास रोजगार निर्मिती करून देणे शक्य झाले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था ही पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या व्यापक कल्पनांशी ताळमेळ साधत तंत्रज्ञानात आपले योगदान हे देशासाठी तसेच विशेष करून महाराष्ट्रासाठी देत आहे. यानुसार मागील महिन्यात मुंबई दौर्‍यात मा.श्री नरेंद्रजी मोदी यांनी Aख सेंटर चे उद्घाटन केले आहे. असे देखील ते म्हणाले. 

वाधवानी संस्थेच्या बरोबरीने राज्याचा कौशल्य विकास विभाग भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करून नव्या उपाययोजनांसाठी व उपयुक्त मनुष्यबळ निर्मितीसाठी काम करीत आहे. राज्यात ९ हजार कौशल्य विकास केंद्रे आहेत. याचा फायदा उत्तम मनुष्यबळ निर्मितीसाठी होत असल्याची माहिती श्री निलंगेकर यांनी प्रसंगी दिली.

केंद्र सरकार देशपातळीवर कौशल्य संबंधित स्पर्धा घेते. वर्ष २०१४ पर्यंत यात महाराष्ट्राचे नाव खूप खालच्या क्रमांकावर होते. परंतु मागील दोन वर्षे २०१७- १८ साली अशा प्रकारच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम आहे. तसेच उत्तम मनुष्यबळ निर्मितीचा विचार करता दुबई मध्ये आशा प्रकारच्या स्पर्धा जागतिक पातळीवर घेतल्या जातात. त्यानुसार बांधकाम क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ देण्यात भारत अग्रेसर आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे श्री निलंगेकर यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले विशेष करून सहा प्रकारच्या कौशल्य विद्यापीठांची स्थापना होत असून यात वन क्षेत्र हा एक विभाग असून यातही कौशल्य प्रशिक्षण देता येते हे अजून जास्त कुणाला ठाऊक नाही त्यातही राज्य उत्तम काम करत आहे. तसेच यात शेती क्षेत्र महत्वाचे असून आम्ही त्यासाठी कौशल्याच्या माध्यमातून प्रगती करण्यास अधिक प्रयत्नशील आहोत. आणि यासाठीचे कार्य अधिक प्रगतीपथावर आहे.

देशातील लोकसंख्येची तुलना करता तरुण लोकसंख्या ही ५० टक्क्यांहून अधिक असून, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्यात त्यासाठी ४१ कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आहेत. तसेच देशात सध्या उपलब्ध असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ ही कोणत्याही देशातील उद्योजकांना भारतात उद्योग सुरु करण्यासाठी जमेची बाजू आहे. आवश्यकतेप्रमाणे जगाला उत्तम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नक्कीच त्यात सहभागी होईल, असे प्रतिपादन शेवटी निलंगेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment