लातूर:-(प्रतिनिधी) :- भारतीय लष्कराने दि.29 सप्टेंबर 2016 रोजी रात्री साडे बारानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये चार तासांत सर्जिकल स्ट्राईकची कारवाई पार पाडली होती. त्यास 'पराक्रम पर्व' म्हणून संबोधले जाते. या दरम्यान गाजवलेल्या असामान्य शौर्याचा अभिमान व सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.29 सप्टेंबर 2018 रोजी लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रॅलीचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.रॅली दयानंद महाविद्यालय ते शिवाजी चौक मार्गे टिळक चौक पर्येंत काढण्यात आली.
सदर रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके हे होते. तर उद्घाटक म्हणून दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य जोगेंद्र सिंह बिसेन यांनी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना भारतीय जवानांच्या पराक्रमा विषयीची माहिती देऊन देशाची सेवा, राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून सांगितले.त्यानंतर त्यांनी रॅलीचे उदघाटन करून रॅलीच्या यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे सहकार्यक्रमाधिकारी प्रा.अकांक्षा भांजी, प्रा.योगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली यशस्वीपणे पार पडली. यावेळी रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. संतोष पाटील, सिनेट सदस्य प्रा.डॉ. संदीप जगदाळे, प्रा.मनीषा अष्टेकर,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा.बालाजी कांबळे, प्रा.विवेक झंपले, प्रा.डॉ. शिवकुमार राऊतराव आदींची उपस्थिती होती. रॅलीत स्वयंसेवकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक मध्ये देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. : *प्रसिद्धि प्रमुख डॉ साईनाथ उमाटे दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर*

No comments:
Post a Comment