लातूर, दि. 30ः येथील माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी लाहोटी कम्पाऊंड येथील कृष्णकुमार लाहोटी माहेश्वरी सभागृहात खेळीमेळीत पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर केला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकिशोर सोनी, सचिव प्रेमकिशोर मुंदडा, संचालक सुरेश मालू, शिवाजी गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. माहेश्वरी पतसंस्थेला स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ मिळत आहे, असे नमुद करून राजकुमार पल्लोड यांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांना लहान-मोठ्या व्यवसायांसाठी पतपुरवठा करून त्यांच्यात आर्थिक पत निर्माण करत असल्याचे पल्लोड यांनी सांगितले.
संस्थेचे व्यवस्थापक बी.एन. पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. अहवालातील प्रत्येक विषय संचालकांनी मांडला. त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. यावेळी ठेवीदार सभासदांचा सत्कार करण्यात आला. महेश पूजन करून दीप प्रज्वलनाने सभेची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व अहवाल वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेचे सचिव प्रेमकिशोर मुंदडा यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक बी.एन. पाटील, रोखपाल गोविंद पवार, सहाय्यक पंडीत सोमनाथ गोरख यांनी परिश्रम घेतले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी समर्पक उत्तरे देण्यात आली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment