निलंगाःप्रतिनिधी
राजेवाडी हे एक महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील छोटस गाव. राजेवाडी गाव हलगरा ग्रामपंचायत अंतर्गत येत. हलगरा गावात ग्रामपंचायत निवडणूक गेल्या वर्षी ओक्टोम्बर मध्ये पार पडली. मागील दोन वर्ष हलगरा गावात लोकचळवळी मधून पाण्यावर प्रचंड काम झालं. हलगरा गावातील पाणलोट कामाचा अनुभव व नवीन ग्रामपंचायतीचा पुढाकाराने राजेवाडी गावाने आमिर खान प्रस्तुत वॉटर कप स्पर्धा 3 मध्ये सहभाग नोंदवला.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराला राजेवाडीतील 25 कुटुंबांचा तसेच निलंगा प्रशासन व तालुक्यातील विविध संघटनांचा प्रचंड प्रतिसादात भेटला. स्पर्धेतील कालावधीत श्रमदान चळवळ मोठी उभी राहिली, गावाच्या उदिष्टापेक्षा तीन पटीनं काम झालं. याहू, अमेरिका कंपनीने सीएसआर फंड अंतर्गत 18 लाख रुपयाचं डिझेल व इतर कमावरती खर्च केला. तसेच टाटा फियाट कंपनीने सीएसआर फंड अंतर्गत 12 लाख रुपये खर्च करून नवीन सिमेंट बंधारा बांधला. बी जी एस व मानवलोक संस्थांनी 500 तास पोकलेन व जी सी बी मोफत उपलब्ध करून दिली. स्पर्धेच्या कालावधीत 60 लाख रुपयाचं खर्च पाणलोट कमावरती झाला.
काल वॉटर कप स्पर्धा 3 स्पर्धेचा निकाल पुणे येथील कार्यक्रमात जाहीर झाला, राजेवाडीला तालुका स्थरीय 10 लाखाचं पारितोषिक पाणी फौंडेशन तर्फे देण्यात आलं. तसेच महाराष्ट शासना तर्फे 5 लाखाचं पारितोषिक देण्यात आलं. पारितोषिक वितरण सोहळ्यात महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुपर स्टार अभिनेता आमिर खान यांनी सरपंच सौ मंगलबाई व्यंकटराव पाटील व उपसरपंच अमृत बसवदे यांना मानचिन्ह दिल. या कार्यक्रमाला गावातून रमेश मदरसे, शिवाजी वागदुरे, राजेंद्र मदरसे, गोविंद गायकवा, सोमनाथ म्हेत्रे, रवी कुंभार, ग्रामसेवक माळी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी जाधव, शिवाजी मदरसे, संजय हलगरकर, मारुती मुगळे, राजेंद्र गायकवा उपस्तित होते.

No comments:
Post a Comment