लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे प्रार्थना सभा

Monday, August 13, 2018

लातूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त त्यांना आदरांजलीवाहण्यासाठी मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आदरणीय विलासराव देशमुख यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले. त्यांचा सर्वांगीण विकासाचे सुत्र हाच विकासमंत्र होता. त्यांच्यादूरदृष्टी नेतृत्वाखाली प्रगतीपथावर वाटचाल करतांना या काळात लातूरने कात टाकून विविध क्षेत्रात भरारी घेतली. तर शिक्षणाचा लातूरपॅटर्नचा नावलौकीक राज्यात आणि देशभर झाला. लातूरमध्ये सहकार आणि कृषीविकासातून आर्थिक क्रांती झाली. विलासरावजीनी लातूरजिल्ह्रातील सामाजिक वातावरण सौहार्दतेचे ठेवले. यामूळे उद्योग, व्यवसाय, व्यापारास चालना मिळाली. 

शहरासोबत ग्रामीण भागाचाकायापालट झाला. ग्रामविकासाचे हे प्रारूप लातूरच्या माध्यमातून नावारूपास आले. विलासरावाच्या नेतृत्वाची किमया झाली आणि जनतेचेआत्मभान जागे झाले. सर्वसामान्यांनी प्रबोधनाची कास धरली एक विकासाची चळवळ सुरू झाली. या काळात जी सामाजिक आंदोलने झालीत्यामूळे वाईट रुढी, परंपरा, कर्मठता, देवभाळेपण ही दैववादीवृत्ती लोप पावली.आम्ही कोणी तरी आहोत आणि आम्ही आमचा विजय मिळवूशकतो ही लढाऊ राजकीय विधायक उर्मी सामान्य लातूरकरात मनात जागवली. यामूळे लातूरने राजकारणा सोबत शिक्षण, क्रीडा, मंनोरंजन,वित्त, उद्योग व व्यापार सर्व क्षेत्रात भरारी घेतली. एक वेगळे जग लातूरकरांच्या मनात त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले.

अशा लोकप्रिय लोकनेत्याला स्मृतिदिनानिमीत्त आदरांजली वाहण्यासाठी मंगळवार दिनांक 14 ऑगस्ट 2018 रोजी विलासबाग, बाभळगावयेथे प्रार्थना सभा आयोजित केली आहे.

या सभेसाठी सकाळी 8.50 वाजता प्रार्थनास्थळी स्थानापन्न होणे अपेक्षित आहे. सकाळी 9.00 वाजता राम बोरगावकर आणि समूह यांचास्वरांजली कार्यक्रम होईल. यानंतर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी 9.55 वाजता प्रार्थनासभा संपेल. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन कवी योगीराज माने व सुत्रसंचालक जीवन सुरवसे करणार आहेत. कार्यक्रमास जनतेने आवर्जूनउपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment