लातूर, दि १३
लातूर जिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर लिंगायत धर्मीयांचे प्रतिकात्मक सामुहिक " ईष्टलिंगपूजा " करून आंदोलन करण्यात येत आहे.
लिंगायत स्वतंत्र धर्माचे प्रणेते, वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डाँ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर श्रावण सोमवार दि. १३ आँगस्ट २०१८ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत महात्मा बसवेश्वर यांचे अनुयायी व बसव तत्वाला मानणारे लिंगायत धर्मीय शरण शरणी हे प्रतिकात्मक, सामुदायिक ईष्टलिंगपूजा करून आंदोलन करणार आहेत .
लिंगायत स्वतंत्र धर्म संवैधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा द्यावा , महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करा, मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर स्मारक निर्माण करावे, लिंगायत धर्मीयांची स्वतंत्र जनगणना करावी, लिंगायत धर्मातील अद्यापही अनआरक्षित जातींना आरक्षण द्यावे, लिंगायत यांच्यासाठी गाव तिथे स्मशानभूमी व वसतीगृहे विकसित करावे, लिंगायत विद्यार्थ्यांना शिक्षणात फीस मध्ये ५०% सुट द्यावी व शिष्यवृत्ती द्यावी, इत्यादी मागण्यासाठी लिंगायत धर्मीय आंदोलन करीत असून विद्यमान सरकारला जागे करण्याचा अनोखा प्रयत्न या आंदोलनातून ते करीत आहेत. हे आंदोलन लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, औसा तहसील कार्यालयासमोर होत आहे.
लिंगायत धर्मीयांनी मागील दोन वर्षापासून राज्यभर अनेक मोर्चे काढले त्यात नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर येथे लाखोंचे मोर्चे निघूनही सरकार दखल घेत नसल्याने इतर समाजापेक्षा स्वतंत्र वेगळी ओळख असलेल्या लिंगायत धर्मातील सर्वच जाती पोटजातीच्या लोकांनी आंदोलनाचा पविञा बदलत रस्त्यावर येऊन " ईष्टलिंग पूजा " करण्याचा एक अनोखा प्रयोग प्रयत्न केला आहे. एक लिंगायत कोटी लिंगायत , भारत देशा जय बसवेशा असा नारा देत लिंगायत आता रस्त्यावर उतरले आहेत. मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता लिंगायत समाजही आरक्षण व अल्पसंख्यांक दर्जा चे हक्क अधिकार मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन करीत आहे. याकडे राज्य सरकार व केंद्र सरकार कसे पाहते आणि स्वतंत्र धर्माच्या या मागणीला कशी दाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment