भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता "अर्जुन" : अमित शाह

Sunday, August 12, 2018

'महाआघाडीला घाबरू नका.त्यांना  पराभूत  करायचे  हे माझ्यावर सोडा. 

 मेरठ दि :-
'लोकसभा निवडणुकीच्या महाभारतात सुरुवातीच्या ५-६ दिवसांचे निकाल काहीही असोत पण १८ व्या दिवशी अर्जुनालाच जिंकावं लागेल आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अर्जुनच आहे', असं सांगतानाच 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशातून घराणेशाहीचं संपुष्टात येईल', असा दावा उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या भाजप कार्यसमितीच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी हा निर्धार व्यक्त केला.

तुम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. बाकी मी पाहून घेतो', असं अमित शहा म्हणाले.  २०१९ च्या लोकसभेत काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात महाआघाडी करत आहेत त्या मुळे भाजप कार्यकर्त्यात खळबळ उडालीअसतनाच आज या महाआघाडीला न घाबरण्याचा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय. 'महाआघाडीला घाबरू नका. विरोधकांना कसे  पराभूत  करायचे  हे माझ्यावर सोडा. त्याची चिंता तुम्ही करू नका', असं सांगतानाच  २०१९ मध्ये एक तरी जादा सीट जिंकून दाखवणारच', असा निर्धारही शहा यांनी व्यक्त केला. 

'उत्तर प्रदेशात बसपा, काँग्रेस आणि सपा या सर्वांना आपण पराभूत केलं होतं. २०१७ मध्ये आपण निवडणुका लढलो त्यावेळी दोन मुलांनी हातमिळवणी केली होती. मात्र तरीही आपण ३०० हून अधिक जागा जिंकलो. यावेळी तिघेजण एकत्र आले तरी आपण ७४ पेक्षा कमी जागा जिंकणार नाही', असं शहा यांनी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment