निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आ.अमित देशमुख

Sunday, August 12, 2018




विलास सहकारी साखर कारखाना व नेचर केयर फर्टीलायझर्स  यांच्या सहकार्याने साडेबाराशे एकरवर सेंद्रियऊस लागवड


लातूर प्रतिनिधी

निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीतून उत्पादीत केलेले अन्न आवश्यक आहे. सध्या रासायनिक खत व औषधांचा वापर न करता सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सेंद्रिय शेती काळाचीगरज  असल्याने सर्वांची विषमुक्त शेतीकडे वाटचाल होत आहे. लातूर तालुक्यात करण्यात येत असलेल्या सेंद्रियऊस शेतीची माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरयांनी कव्हा येथे सेंद्रिय ऊस शेतीस प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बहारदारआलेल्या उसाचे व शेतकऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले.


          विलास सहकारी साखर कारखाना व नेचर केयर फर्टीलायझर्स  यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय ऊस शेतीचेयशस्वी प्रयोग लातूर जिल्हामध्ये केला जात आहे. त्याच अनषंगाने आमदार अमित विलासराव देशमुख यांनीरविवार (दि.१२) रोजी सिकांदरपुर, कव्हा, खोपेगाव व महाराणाप्रताप नगर येथील सेंद्रिय ऊस उत्पादक शेतकरी यांच्या  शेतामध्ये जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले. शेती करताना येणारा आर्थिक ताण कमीकरण्यासाठी  आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


सेंद्रिय ऊस उत्पादक  शेतकऱ्यांना विलास कारखाना व नेचर केयर  फर्टीलयझर  यांच्या सहकार्यातून लातूर जिल्ह्यात साडेबाराशे एकरवर सेंद्रिय ऊश शेती करण्यात आली आहे. तर ५९० शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत आहेत. या सर्व बाबीसठी  तांत्रिक सहकार्य लाभत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून निरोगी वविषमुक्त महाराष्ट्रकडे वाटचाल करावी असे आवाहनही आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी यांनी केले. शेतकऱ्यांना वर्षभराचे कामकाजाचे व पूर्व मशागत अंतर्गत मशागत याबाबत व लागवड ते काढणी पर्यंत नेचर केयरचे सुनिल बर्वे व शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केले.


          यावेळी विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे,  लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष दगडूसाहेबपडीले, उदगीर तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, संचालक रामचंद्र सुडे, युवराज जाधव, बालाजी साळुंखे, उमेशबेद्रे, सिकंदर पटेल, नितीन पाटील, शेतकरी बाला पाटील, शैलेश गुडे, श्री सुरवसे, जयकुमार मोरे, श्रीकांत कचरेव  उस शेती अधिकारी कल्याणकर, ऊस विकास अधिकारी कदम, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:

Post a Comment