हिंगोली / प्रतिनिधी
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी रूईभर संस्थान निवासी प.पु. आप्पाबाबा यांच्या अनुष्ठाण प्रवचनाचा कार्यक्रम हिंगोलीत होणार आहे. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन शास्त्री नगर येथे करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यानिमीत्त 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट श्रावण मास तपो अनुष्ठाण दत्तस्वरूप आप्पा बाबा हिंगोली येथील दिलीप गुंडेवार यांच्या निवासस्थानी करतात. दुपारी 5 ते 6 प्रवचन आहे. आप्पा बाबा अनुष्ठाणाच्या काळात मौन पाळतात. व दररोज प्रवचनाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमास अधिकात अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे व प्रवचनाचा लाभ घ्यावा अशी विनंती दिलीप गुंडेवार यांनी केले आहे. प.पु. आप्पा बाबा यांचे 12 ऑगस्ट रोजी आगमन होईल व 28 ऑगस्ट रोजी ते रूईभरकडे जातील. व सप्टेंबर महिन्यात त्यांचा परराष्ट्र दौरा आहे.
No comments:
Post a Comment