![]() |
| photo by shyam bhattad |
लातूर - स्वातंत्र्य दिन जवळ येऊ लागलाय .तसं आठवडाभरापूर्वीच त्याची चाहूल लागली .प्रत्येक जण आपापल्या परीनं स्वातंत्र्य दिनाची तयारी करतोय. शासकीय कार्यालये ,खाजगी संस्था याच्या जोडीलाच सामान्य नागरिकही त्यात सहभागी आहे .प्रत्येकाचे देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत झाले आहे .
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . विविध स्मारकावरही अशी रोषणाई केली जात असतानाच लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालय यावर्षी पहिल्यांदाच तिरंग्या प्रकाशात न्हाऊन निघाले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती वर तिरंगा झेंड्याच्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .बार्शी रस्त्यावरून जाणार्या-येणार्या प्रत्येकाचे लक्ष तिकडे वेधले जात आहे .आतापर्यंत इतर शहरातील विद्युत रोषणाई पाहणारे लातूरकर यावर्षी आपल्या शहरात करण्यात आलेली ही रोषणाई पाहून मनोमन सुखावले आहेत आणि अर्थातच ही रोषणाई साकारणार्या वन न्ड ओन्ली जी श्रीकांत यांना धन्यवाद देत आहेत

No comments:
Post a Comment