हिंगोली / प्रतिनिधी
येथील मारवाडी युवा मंच मिडटाऊन शाखा हिंगोलीच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी येथील विद्या नगर येथील अर्चना सोनी यांच्या निवासस्थानी सावन तीज त्यौहार कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृता भालेराव यांची तर प्रमुख पाहूणे म्हणून राठोड, राजगुरू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गणेश पुजन करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवजी रांगोली स्पर्धा, सावन गीत स्पर्धा, सरप्राईज गेम, सावन क्रीन स्पर्धा आदींसह मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमात नृत्य, नाटीका, गाणे असे विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्चना सोनी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारवाडी युवा मंच मिडटाऊन शाखा हिंगोलीच्या अध्यक्षा सुनिता खंडेलवाल, मिना झंवर, प्रिती खंडेलवाल, राखी झंवर, स्मिता गुरावा, दिपा भक्कड, विजया अग्रवाल, सुनिता भंसाळी, कल्पना तोष्णीवाल, मनिषा तोष्णीवाल, अनिता सोमाणी, ज्योती झंवर, मनिषा केडीया, सुशीला मुंदडा, कंचन मुंदडा आदींनी परिश्रम घेतले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment