हिंगोली / प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची जिल्हास्तरीय कार्यशाळा 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले असून जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेवून संबंधित कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे होत्या. यावेळी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल, डॉ.सतीश पाचपुते, रामराव वाघडव यांच्यासह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड, न.प.चे मुख्याधिकारी रामदास पाटील तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंद भवर, गटविकास अधिकारी आत्मराम बोंद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेतला.
स्वच्छतेविषयी ग्रामीण भागात व्यापक स्वरूपात मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रमातंर्गत झालेली कामे महत्वपूर्ण असून, या कामाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment