कळमनुरी / प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर मंतरवर 9 ऑगस्ट रोजी काही समाजकंठकांनी भारतीय संविधान जाळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली शाखेच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
भारताचा सर्वोच्च ग्रंथ असलेले भारतीय संविधान 9 ऑगस्ट रोजी स्वत:ला संवर्ण समजणाऱ्या काही समाजकंठकांनी जाळले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आरक्षणाविरोधात घोषणा दिल्या. व याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. त्यामुळे संबंधित देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तसेच या समाजकंठकांविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा व देशद्रोहाचा कायदा लावून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी 11 ऑगस्ट रोजी कळमनुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य हिंगोली शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर डॉ. सतिश पाचपुते, बबन डुकरे, शंकर फोपसे, नागोराव खुडे, अजय बर्गे, बाळू वाळे, दतराव वाळे, सुरेश वाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच याबाबत क ळमनुरी पोलीस निरीक्षकांना दुसरे एक निवेदन देण्यात आले आहे. यामध्येही संविधान जाळणाऱ्या समाजकंठक ांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अरूण वाढवे, शिवाजी पाईकराव, सुनिल पाईकराव, पिराजी इंगोले, सोनू वाढवे, शेषेराव वाढवे, छपन्न पाईकराव, सुधाकर पाईकराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment