हिंगोली / प्रतिनिधी
येथील संविधान प्रेमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ 11 ऑगस्ट रोजी येथील नांदेडा नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनुवादी श्रीनिवास पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्याकडे लेखी फिर्याद देवून केली आहे.
शहरातील नांदेड नाका, अग्रसेन चौक येथे 11 ऑगस्ट रोजी आंबेडकरवादी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे लेखी फिर्याद देऊन श्रीनिवास पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर संविधान जाळल्याप्रकरणी तसेच आंबेडकरां बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी आणि हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी योगेश नरवाडे, विक्की काशीदे, प्रकाश इंगोले, किरण घोंगडे, मिलिंद उबाळे, अमित कळासरे, स्वप्नील इंगळे, प्रकाश मगरे, विकी खंदारे, आनंद धुळे, सुजय देशमुख, बंडू नरवाडे, प्रवीण पाईकराव, दीपक केळे, रवी कांबळे, प्रकाश पठाडे, मयूर नरवाडे, बबलु धाबे, राष्ट्रपाल आठवले, पवण कुरील, आकाश काळे, शिवनंदाबाई धांडे, चंदाबाई सोनवणे, उषा इंगोले, मिराबाई दिपके, विमल खिल्लारे, गयाबाई खिल्लारे, शांताबाई भोयर, जानकाबाई इंगोले आदींसह मोठ्या संख्येने महिला, युवक सहभागी होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment