पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणार सकल मराठा समाजाचा निर्णय

Sunday, August 12, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
सकल मराठा समाज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये काही मागण्यांचा समावेश केला असून या मागण्या 14 ऑगस्टपर्यंत पुर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. तर सर्व मंत्री, खासदार, आमदार यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 

न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणासाठी शांततेचे आवाहन केल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे व त्याची तारीख तात्काळ जाहीर करावी, सदरील तारखेपुर्वी राज्य विशेष मागासवर्ग आयोगाचा अहवाल बोलविणे व विशेष अधिवेशनात चर्चा घडविणे आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करणे,

 मराठा आंदोलनातील गुन्हे सरकट मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, मराठा वसतिगृह त्वरीत सुरू करावेत, सारथी संस्था त्वरीत कार्यान्वित करावी व मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या शहीदांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 50 लाख रूपये रोख व प्रत्येकी 50 लाख रूपये रोख व कुटूंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत समाविष्ट करावेत, तसेच मुकमोर्चातील मागण्या मान्य कराव्यात अन्यि 15 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा हिंगोलीच्या वतीने एक वेळ अन्नत्याग आंदोलन, साखळी उपोषण व आपणासह सर्व मंत्री, खासदार, आमदारांना गावबंदी करण्यात येईल तसेच 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्यात येणार आहे. यामुळे उद्‌‌‌भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार बोथीकर यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment