लातूरचा खासदार ३ लाख मताधिक्याने निवडून आणणार : पालकमंत्री

Sunday, August 5, 2018

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संकल्प 
लातूर, दि. ४ - सबका साथ सबका विकास या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने लोकहितांच्या विविध योजना सक्षमपणे राबविलेल्या आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झालेला असून या विकासाच्या मुद्दावर आगामी लोकसभा निवडणूक ३ लाखा पेक्षा अधिक मताधिक्याने जिंकण्याचा ठराव पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मांडला. या ठरावाला उपस्थित पक्ष व स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांनी टाळ्या वाजवून दाद देत लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष व स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. गोविंद केेंद्रे, खा. डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीपराव देशमुख, रमेश कराड, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह जि.प., मनपा व नगर पालिका, नगर पंचायत पदाधिकारी उपस्थीत होते. 

या बैठकीत बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकहिताला प्राधान्य देत भ्रष्टाचारास आळा घालण्याचे काम केलेले आहे. सबका साथ सबका विकास या भूमीकेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. त्याच बरोबर देश व देशातर्ंगत सुरक्षेला प्राधान्य दिल्याने जागतीक स्तरावर भारताला आपला दबदबा निर्माण करण्यात यश प्राप्त झालेले आहे. त्यानुसारच मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अनेक विकास कामे करून विरोधकांना चोख उत्तर दिलेले असल्याने पक्षासोबत जनता आजही असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी स्पष्ट केले. 

केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना पक्ष प्रवाहात आणण्याचे काम आगामी काळात करणे अपेक्षीत असल्याचे सांगून, देशहितासाठी लोकसभा निवडणूका जिंकणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्षासाठी अधिकाधीक वेळ देवून पक्षाने दिलेला २३ कलमी कार्यक्रम राबवावा असे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले. जनता आपल्या सोबत असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे असेही पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी सांगीतले. 

बैठकीच्या सुरूवातीला सांगली व जळगाव महापालीका निवडणूकीत विजय मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस व प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील तसेच पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची लातूर, नांदेड व उस्मानाबाद लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावास उपस्थित पदाधिकार्‍यांनी टाळ्यांच्या गजर्‍यात अनुमोदन दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे तर आभार शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मानले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment