अहमदपूर/ प्रतिनिधी :मराठा आरक्षणासाठी सुरू असणारे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे .एवढेच नव्हे तर आरक्षणासाठी आत्महत्या होऊ लागल्या आहेत.आज रविवारी अहमदपूर तालुक्यातील तीर्थ येथील तुकाराम रामजी पेड या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .
विष प्राशन करण्यापूर्वी पेड यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात आरक्षणासाठीच आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आहे .मागील दहा दिवसांपासून आरक्षणासाठी ठिय्या आंदोलनात सहभागी झालो होतो परंतु तरीही आरक्षण मिळाले नसल्याने आपण विष प्राशन करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पेड यांना तातडीने लातूरला दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment