जळगाव: दि प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार की भाजपाचे कमळ फुलणार याबाबत उत्सुकता होती . सुरेश जैन यांची जळगाव महापालिकेत गेल्या ४० वर्षांपासून सत्ता होती. सुरेश जैन यांच्या या वर्चस्वाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुंग लावत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्याची जादू केली आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.
आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार ७५ जागा पैकी भाजपने ५७ जागांवर आघाडी घेतली हे.जळगावमध्ये भाजपचाच महापौर बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या ४० वर्षांपासून जळगाव महापालिकेवर वर्चस्व असलेल्या सुरेश जैन यांचं संस्थान अखेर खालसा झालं आहे. महापालिका निवडणुकीत जळगावकरांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप ५७ जागांवर आघाडीवर असून शिवसेना १४ जागांवर आघाडीवर आहे.

No comments:
Post a Comment