किनवट(प्रतिनिधी)किनवट माहूर तालुक्यात दि15 ते 17 ऑग.या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेली ही आपत्ती लक्षात घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर व भाजप नेते डॉ अशोक पाटील सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी यांनी रविवारी रिमझीम पावसातही नुकसानबाधित शेतीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली तसेच पूरबाधित शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळऊन देण्याचे आश्वासन दिले.
किनवट माहूर तालुक्यात मागील दोन दिवसात सर्वत्र वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे नदी नाल्याना पूर येऊन पुराचे पाणी शेतात घुसले परिणामी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले.पुरामुळे पीकासह शेतजमीनी खरडून गेल्या.अशातच हवेची गती प्रचंड होती त्यामुळे उभी पिके आडवी पडली.पुराच्या पाण्यात पिकेतर गेलीच मात्र अनेक घरांची पडझड होऊन शेकडो जनावरे दगावली.
किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढावलेली ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर, भाजप नेते डॉ अशोक पाटील सूर्यवंशी यांनी दि 19-8-2018 रोज रविवारी भर पावसात आपत्तीग्रस्त आप्पाराव पेठ, शिवनी, इस्लापूर, नंदगाव, थारा, दीग्रस, बोधडी. बु , बोधडी खु, पार्डि, येंदा-पेंदा, कोपरा या ठिकाणी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीक्षेत्राची पाहणी केली तसेच घरांचे व जनावरांचे नुकसान झालेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला. पुरामुळे उध्भवलेली ही गंभीर परिस्थिती पाहून आ.राम पाटील डॉ अशोक पाटील यांनी तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले तसेच मी डॉ अशोक पाटील यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेईल आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळऊन देईन असे आश्वासन आ.राम पाटील यांनी शेतकऱ्यांसह पीडित नागरिकांना दिले आहे.
या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भगवान हुरदुके, निळकंठ कातले, प.स सदस्य इंदल राठोड, नगरसेवक शिवाजी आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, बाबूराव केंद्रे, डॉ. कराड, गोविंद अंकुरवाड, सुमीत राठोड, अमरदिप कदम, सुशील नावडे, अरुणभाऊ सुकळकर, बालाजी पाटील, नरेश सिरमणवार, शिवा क्यातमवार, सतिष बिराजदार, संतोष चनमणवार, सतिश नेम्माणीवार, माणिकराव पाटील, मनोहर ताटे, हौसाजी काकडे, बाळकृष्ण कदम, नचिकेत नेम्माणीवार, त्रिशूल पाटील, गजू आरमाळकर, नरसिंग तक्कलवार, विलास पाटील, अमोल महल्ले उपस्थित होते. आ.राम पाटील रातोळीकर व डॉ अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या दौऱ्यामुळे आप्पाराव पेठ, इस्लापूर, शिवनी, बोधडी बु या परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान दिवसभर पाहणी केल्यानंतर आ.रातोळीकरांनी रात्री 9:00 वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी शक्ती कदम व तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून पूर परिस्थितीचा अहवाल घेतला तसेच नुकसानग्रस्त शेतांचा, घरांचा व जनावरांचा पंचनामा त्वरित करून शासनास सादर करण्याचे सूचित केले.या बैठकीस गंगाधर जोशी, डॉ अशोक पाटील सुर्यवंशी हे उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:
Post a Comment