अहमदपूर शहरात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,लोकनेते गोपिनाथराव मूंडे,महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला जागा उपलब्ध करून ना हरकत देण्याचा निर्णय नगर पालिकेने आज घेतला असून या मूळे लवकरच शहरात अहिल्यादेवी होळकर,महात्मा बसवेश्वर,गोपिनाथराव मूंडे यांचे पुतळे उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. आजच्या बैठकीत पूतळ्याला जागा देण्याचा विषय ठेवण्यात आला होता.हा ठराव एकमताने मंजूर करून शहरात अहिल्यादेवी होळकर,गोपिनाथराव मूंडे,महात्मा बसवेश्वर यांच्या पूतळ्यासाठी जागा व इतर सर्व ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या वेळी मान्यता दिल्या बद्दल सकल हटकर धनगर समाजाच्या वतीने नगराध्यक्षा,उपनगराध्यक्षा यांच्या सह सर्व नगरसेवकांचा येथे सत्कार करून आभार व्यक्त केले.
या वेळी अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष रामभाऊ नरवटे पाटील, नवनाथ सुरनर, बळीरामजी भिंगोले,अनंतराव होळकर,व्यंकटराव करले, राम देवकक्ते,तूकाराम देवकत्ते,देवीदास मोतिराम,बालाजी हेमनर, सूरनर, गंगाधरराव देपे,सूर्यकांत चिगळे, बाळासाहेब बेडदे,गोविंदराव गिरी,संग्राम नरवटे,सूर्यकांत सुरनर,पांडुरंग लोहकरे, बालाजी पारेकर,गफारखान पठाण,संतोष होळकर,आनंद देवकक्ते,किरण बारमाळे,राजू मूकनर,अविनाश सूरनर,रवी देवकत्ते,राजू थगनर,प्रा मोहन नरवटे,रामदास भंडारी,संग्राम नरवटे,भलभीम देवकते,गोविंद करले,बबन नरवटे,मधुकर करले,अमोल पाटील,लखन घोडके,शिवानंद शिंदे,रामदास देवकत्ते,राम देवकत्ते,दत्ता सूरनर,ज्ञानेश्वर बनसोडे,भागवत देवकत्ते,महादेव देवकत्ते,गोविंद बारूळे,ज्ञानेश्वर केळकर,चंद्रकांत सूरनर,गणेश हेमनर,विशाल माने,खंडू चिडगीर,मारोती हाके,शेषेराव हाके,सुनिल लटकरे,अंगद कोडे आदींची उपस्थीती होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment