शैलेश लाहोटी दृष्ट काढून घ्या अमित देशमुख यांचा सल्ला

Monday, August 20, 2018
छायाचित्र : श्याम भट्टड 
लातूर /अजय असोपा  
काय घडल, काय बिघडलं याच्या मी खोलात जाणार नाही. शैलेश लाहोटी तुमच्या आणि माझ्या एकत्र येण्याने उद्या वर्तमानपत्राची बॅनर बातमी होणार आहे. कितीतरी लोकांची पोट दुखणार आहेत तुम्ही रात्री नजर काढून घ्या असा सल्ला भाजपा शहर अध्यक्ष व राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या संदर्भात राजस्थान विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना अमित देशमुख यांनी काढला. यावेळा व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, ऍड. आशिष वाजपेयी, मार्केट कमेटीचे सभापती ललित शहा, अशोक गट्टु अग्रवाल व भुमीजाते उपस्थित होते. 
-
लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेअंतर्गत गुणवंत विद्यार्थी सत्कार, शिष्यवृत्ती वितरण, संस्था भुमीदाता अनावरण प्रसंगी प्रमुख पाहूणे आमदार अमित देशमुख होते. 4 वर्षापुर्वी कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले व भाजपातर्फे अमित देशमुख विरूद्ध विधानसभा निवडणुक लढविलेले शैलेश लाहोटी एका व्यासपीठावर कितीतरी वर्षानी आले. या संस्थेचे अध्यक्ष स्वत: शैलेश लाहोटी आहे. त्या संस्थेत शैलेश लाहोटी यांनी अमित देशमुख यांना बोलावल्यामुळे अनेकांच्या मनात अमित देशमुख काय बोलणार इकडे लक्ष होते. अमित देशमुख आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मी आणि शैलेश लाहोटी एका व्यासपीठावर आल्याने उद्याची बॅनर बातमी होणार आहे.

 कितीतरी लोकांच्या पोटात दुखणार आहे. याचा अंदाज बांधता येणार नाही. शैलेश लाहोटी आणि मी खुप जुने सहकारी आहोत. शैलेश लाहोटी यांनी काय घडले काय, काय बिघडले मला ठावूक नाही त्याच्यात मी आत जाणार नाही. कारण हा गुणवंतांचा सत्कार आहे. त्यावर अनेक जण गुणवंताचा सत्कार तर हा बहाणा आहे. इनको करीब करीब आना है, अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि कुचबूच करत होते. यावेळा शैलेश लाहोटी यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. गुणवंतांचा सत्कार झाला. प्रास्ताविक राजस्थान शिक्षण संस्थेचे सचिव विधीज्ञ व बॅडमिंटन पटू आशिष वाजपेयी यांनी केले. आज दिवसभर अमित देशमुख हे विविध कार्यक्रमाच्या निमीत्ताने तीन वेगवेगळ्या कार्यक्रमात लाहोटी कुटूंबियांसोबत होते. 

सुर्यदर्शन नाही, पण लाहोटीच्या रूपाने चंद्रदर्शन 
अमित देशमुख पुढे म्हणाले की, आज काही दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. पण शैलेश लाहोटींच्या रूपाने चंद्रदर्शन झाले, हा विलषण योगायोग अमित देशमुखांनी व्यक्त केला. आणि दिवसा चंद्राचे दर्शन झाल्याचा आनंद व्यक्त केला. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment