लातुरात रंगला.....राग : रूप और रंग, भजन के संग

Monday, August 20, 2018


लातूर - येथील श्री जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ व रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदंबा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राग : रूप और रंग...भजन के संग हा कार्यक्रम लातूर येथील दयानंद सभागृहात संपन्न झाला. 

संकल्पना आणि प्रस्तुती गायक अमोल निसळ पुणे यांनी सादर केलेल्या अनोख्या सादरीकरणाने लातूरकरांना वेगळया प्रकारच्या गायनातील सादरीकरणाची अनुभूती यानिमित्ताने अनुभवायास मिळाली. भजन सम्राट अनुप जलोटा व पं भिमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेल्या गीतांचे सादरीकरण एका पाठोपाठ अमोल निसळ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व नंतर रोटरी चे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, माजी आमदार वैजनाथ शिंदे, रोटरी मिड टाऊन चे अध्यक्ष डॉ. राजगोपाल तापडिया, सचिव चेतन पंढरीकर, प्रोजेक्ट चेअरमन मन्मथअप्पा पंचाक्षरी, राहुल झिंगाडे, मंदिर समितीचे बसवंतअप्पा भरडे , राजेश्वर डांगे, गंगाधर हामने, मल्लिनाथ मेंगशेट्टे , विरभद्र वाले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. 

भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या सुप्रसिद्ध ऐसी लागी लगन,मीरा हो गई मगन या किरवणी रागातील भजनांनी अनुप मिसळ यांनी मैफिलीची सुरवात केली आणि लातूर रसिकांकडून उत्स्फुर्त दाद मिळवली. सोबतच त्यांनी प्रत्येक भजन कोणत्या रागातील आहे आणि त्याच रागातील बंदिश, चित्रपट गीत, गझल, नाट्यगीत यांचे ही सादरीकरण केले आणि अनोखा प्रयोग या प्रसंगी लातूरकरांना ऐकावयास मिळाला. पंढरी निवासा सखा पांडुरंगा या अभंगला टाळ्यांच्या गजरात अमोल निसळ यांचे कौतुक रसिकांनी केले. जाना था गंगा पार प्रभू हे हिंदी भजन, इंद्रायणी काठी, चदारिया झिनी रे झिनी, ओ काला एक बासुरी वाला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज अशी अनेक अजरामर अभंग या प्रसंगी अमोल निसळ यांनी सादर केले. बाजे मुरलिया बाजे या सादरीकरणाला करून लातूरकरांना पं भीमसेन जोशी यांची आठवण करून देऊन मैफिलीची सांगता केली. या वेळी तबल्यावर निलेश रणदिवे, बासरी/ व्हायोलिन वर शैलेश देशपांडे, किबोर्ड वर रोहित कुलकर्णी तर टाळवर कृष्णकांत पारशेट्टी यांनी साथ संगत केली. या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांचे व कलावंतांचे शाल,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कायक्रमाचे प्रास्ताविक रोटरीयन मन्मथअप्पा पंचाक्षरी यांनी केले, माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करून रोटरी च्या कामाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनू डगवाले, शंकर जगताप यांनी केले तर आभार राहुल झिंगाडे यांनी मानले. यावेळी लातुरातील डॉ अरविंद भातांब्रे, विठ्ठल जगताप, अब्दुल गालिब शेख, चंद्रशेखर पारशेट्टी, शिवानंद कोकणे, वेदांग धाराशिवे, उमेश मोहिते व रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जगदंबा मंडळाचे व रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊन चे सारे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment