मुस्लिम समाजाचे आरक्षनासाठी जेलभरो

Monday, August 20, 2018

निलंगा, : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शेकडो मुस्लिम समाजाच्यावतीने सोमवारी ता. 20 रोजी येथील शिवाजी चौकात संततधार पावसात जेलभरो आंदोलन केले.

मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे हा समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला असून आरक्षणाची गरज आहे. यापूर्वी सच्चर समितीच्या अहवालाची आमलबजावणी झाली नसल्यामुळे मुस्लिम समाज दुर्लक्षित राहिला आहे यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण ,सरंक्षण या तीन प्रमुख मागण्या साठी शिवाजी चौकात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले .

आंदोलन प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन मिनट मौन पाळून श्रधंजलि वाहली.या आंदोलन ला पाठिबा देण्यासाठी प्रदेश कांग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर ,शिवसेनेचे सहसम्पर्क प्रमुख अभय सालुंके, मराठा क्रांति मोर्चेचे डॉ. लालासहेब देशमुख,धनगर आरक्षण मोर्चेचे गोविंद शिंगाडे,झटिंगराव म्हेत्रे, यांनी मनोगत व्यक्त करून मुस्लिम आरक्षनास पाठिबा दिला लातुरचे मोहसिन खान,मोहम्मद अली यांनी मुस्लिम आरक्षण सच्चर कमीटी, रंगनाथ मिश्रा कमिशन,महेमूदुरह्मान कमिशन च्या सिफारशी तत्काल अमलात आनावे अशी मागणी केली

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा 
तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment