लातूर,दि.१८ . अनाथांची माय म्हणून अंतराष्ट्रीय पातळीवर लाकिक प्राप्त थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ येत्या २३ ऑगस्ट २०१८ रोजी लातुरात येत असून, त्या लातूरकरांशी आईच्या काळजातून संवाद साधणार आहेत. माध्यम या सांस्कृतिक,सामाजिक व साहित्यिक विचारपीठाच्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भावनिक उपक्रमात वैशालीताई देशमुख यंाच्या हस्ते माईंचा (सिंधुताई)चा सत्कार करण्यात येणार आहे
गुरुवार,दि.२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजिण्यात आलेल्या या भावपूर्ण संवादास प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी हे उपस्थित राहणार आहेत. माध्यम या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विविध दर्जेदार आणि अभिरुचीसंपन्न कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, माईंचा संवाद ही त्यातील पहिली कडी आहे. या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असेआवाहन संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, उपाध्यक्ष डॉ.बाबासाहेब गोरे, रामानुज रांदड, ईश्वरचंद्र बाहेती, संगमेश्वर बोमणे, श्रीकांत कर्वा, डॉ.हंसराज बाहेती, डॉ.सोमनाथ रोडे, मुख्याध्यापक संघटनेचे वसंतराव पाटील, पत्रकार चंद्रकांत झेरीकुंठे, अजय घोडके, प्रा.योगेश शर्मा, प्रा.विनोद चव्हाण,अनिल पूरी, शामसुंदर गिल्डा आदिंनी केले आहे.
No comments:
Post a Comment