वाजपेयी यांना लोहा येथे सर्व पक्षिय श्रध्दांजली

Sunday, August 19, 2018



लोहा /प्रतिनिधी-भारतरत्न व देशाचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांना शहरातील  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय  श्रध्दांजली वहाण्यात आली.आ. प्रतापराव पाटील चिखलिकर यांच्या प्रमुख उपस्थीत दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शनिवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले होते. 

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना आ. चिखलिकर म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलजी हे एक निष्णात सांसदपटू होते. त्यांनी पोखरण मध्ये अणुचाचणी करून भारताची प्रतिमा जगात उजळ केली. त्यांनी  देशहिताला अधिक प्राधान्य दिले. स्वच्छ प्रतिमेचे अटलजींना देश कधीही विसरू शकणार नाही.

यावेळी कृऊबाचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, केरबा बिडवई, माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, शरद पवार, अंकुश कदम, गजानन सुर्यवंशी, राम पा. पवार, पं.स. सदस्य दत्ता वाले, नामदेव कटकमवार,भास्कर पवार, कृष्णा पापिणवार, समिती सचिव आनंद घोरबांड, नरेंद्र गायकवाड, सुरेश पा. हिलाल, मंगेश पा. क्षिरसागर, बळी पा. जानापुरीकर, मुळे, अभंग पा. गाडेकर, अप्पा धोंडे, माधव पा. पवार,  भानुदास पवार सह बहुसंख्येची उपस्थीती होती.

No comments:

Post a Comment