लोकनेते बाबुरावजी आडसकर हे राजकीय संत : हभप बोराडे महाराज

Sunday, August 19, 2018


आडस / प्रतिनिधी 
समर्पण, त्याग, विश्वास हे संतांचे गुण आहेत. कार्यक्षेत्र वेगळे आहेत. भगतसिंगांनी राष्ट्रासाठी बलिदान दिले, अहिल्यादेवींनी देशभरात मंदिरांची उभारणी केली. आणि स्व. बाबुराव आडसकर यांनी आपल्या राजकीय जीवनात माणसे घडविण्याचे व उभे करण्याचे काम केले. त्यामुळे हे संत आहेत, असे मत लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमीत्त बोलताना हभप बोराडे महाराज यांनी केले

यावेळा माजी मंत्री आ. सुरेश धस, आ. संगीताताई ठोंबरे, आ. आर.टी. देशमुख, माजी आमदार आंधळे, माजी आमदार शिराजभाई, माजी आमदार बदामराव पंडीत, माजी मंत्री अशोकराव पाटील, जि.प.च्या अध्यक्षा कोल्हाळ, जि.प.सभापती राजेसाहेब देशमुख, जि.प.सभापती.., संभाजी आण्णा पंडीत, नांदेडचे अशोकराव देशमुख, परभणीचे ठोंबरे, आनंतबापु चव्हाण, राजकिशोर मोदी, दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर, सोमनाथ आप्पा रोडे, नंदकिशोर मुंदडा, वॉईस चेअरमन मोरे सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य, केजचे माजी सभापती देशमुख, केज बाजार समितीचे सभापती इंगळे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी चेअरमन राजाराम मुंडे, आंबाजोगाई मार्केट कमेटीचे सभापती काचगुंडे, शिवाजीराव पंडीत, भगवान वादक उद्धवबापु आपेगावकर, हनुमंत मोरे, केज जिल्हा परिषदेेचे जिल्हा शल्यचिकीत्सक, बबनराव लोमटे, आडसकर कुटूंबियांचे नातेवाईक, विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी हे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

बोराडे महाराज म्हणाले की, अतिथी देवो भव, पितृ देवा भव, मातृ देवो भव ही आपली संस्कृती आहे. गेली 26 वर्ष पदविरहीत असताना लोकांनी ज्यांच्यावर आणि लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. संत ही पदवी नाही. ही अवस्था आहे. साधना आहे. संतासारखे जगावे लागते, असंही बोराडे महाराज म्हणाले. समाजाला सुख देण्याचे काम संत करत असतात. पण समाज त्यांना सुख देत नाही. संताचे येणे, जाणे, जगणे हा एक भाग आहे. स्वत:चा इतिहास आपण घडवत असतो. आपणास कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण ते भोगावेच लागतात अशा प्रकारे सविस्तर किर्तन बोराडे महाराज यांनी केले. यावेळा शिराज देशमुख, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार केशव आंधळे, माजी मंत्री नवले, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर.टी.देशमुख यांनी विचार मांडले. 

यावेळा आमदार सुरेश धस म्हणाले की, आडसकर साहेब हे आगळ वेगळ व्यक्तीमत्व होते. सध्या मोबाईल वाटसऍप, फेसबुक, गुगल हे जग आहे. मला आडसकर साहेब चौथा मुलगा समजायचे. बाबुरावजी आसकारांनी हजारो लोकांनी नोकऱ्या लावल्या. दैनिक मराठवाडा नेताच्या अग्रलेखाचा खास उल्लेख आमदार सुरेश धस यांनी केला. पाच पैसे न घेता अनेकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या. त्यांच्या कडे अँटी चेंबर नव्हतं. एकंदरीत हजारोंच्या संख्येेने लोक उपस्थित होते. रमेश आडसकर, ऋषिकेश आडसकर यांनी सर्वांचं स्वागत केले.

No comments:

Post a Comment