महाराष्ट्रात परिवर्तन अटळ: खा. अशोक चव्हाण

Friday, August 31, 2018


कोल्हापुर दि प्रतिनिधी  
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही यावेळी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे, फसवणूक केली आहे. म्हणून या सरकारला फडणवीस सरकार नव्हे तर फसणवीस सरकार म्हटले जाते. 
निवडणुकीच्या काळात दाखवलेले स्वप्न आणि आज राज्याची झालेली दुर्दशा पाहता 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' असे विचारण्याची वेळ आली आहे

. भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध राज्यात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. २०१९ मध्ये या सरकारचे विसर्जन होणार, हे निश्चित आहे. भाजप-शिवसेनेला राज्याच चालवणे जमलेले नाही आणि ज्यांना हे जमत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. पण केलेल्या घोषणा पूर्ण करायला या सरकारकडे पैसाच शिल्लक नाही. म्हणूनच सतत दरवाढ, करवाढ करून जनतेवर नाहक आर्थिक बोजा लादला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. काँग्रेसला भयमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. लोकांना सरकारची भीक नको तर त्यांचे हक्क हवे आहेत आणि यासाठीच पुढील निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी सांगितले. 


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment