खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार:पृथ्वीराज चव्हाण

Friday, August 31, 2018

कोल्हापूर दि प्रतिनिधी 
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मागील ४ वर्षात काय दिवे लावले? कोणती आश्वासने पूर्ण केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

निवडणूक प्रचारात भाजपने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांनी तर 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी वल्गना केली होती. पण प्रत्यक्षात सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. भ्रष्टाचार दडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार सातत्याने लोकविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होत असताना सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. या सर्व बाबींचा जनसंघर्ष यात्रेत समाचार घेतला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment