लातूर - लिंगायत धर्म मान्यतेसाठी लातुरात इष्टलिंग पूजा आंदोलन लिंगायत धर्मातील समाज्यांच्या वतीने करण्यात आले. दि 5 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजीत लिंगायत धर्म संमेलनात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी लिंगायत धर्म मान्यतेसाठी आंदोलनाचा पुढील भाग म्हणून दि 13 ऑगस्ट रोजी संबंध जिल्हाभरात प्रत्येक तहसील कार्यालयावर इष्टलिंग पूजा आंदोलन करण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला साथ देत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले.
सदरील आंदोलनात मोठ्या प्रमाणात लिंगायत धर्मातीलयुवक,युवती,महिला,पुरुष, तसेच लहान मुलेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आली. त्यानंतर जवळपास 1 तास इष्टलिंग पूजा व बसवेश्वरांचे वचन म्हणून आरती करून या इष्टलिंग पूजा आंदोलनाची सांगता झाली.
लिंगायत धर्माला धर्म मान्यता मिळाली पाहिजे, राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, 2021 ला होणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्म म्हणून स्वतंत्र जनगणना व्हावी, लिंगायत धर्मातीलणारक्षित जातींच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने शुद्धीपत्रक काढावे, दिवंगत डॉ कलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ गोविंद पानसरे, डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यास अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार लातूर व जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले. निवेदनावर डॉ अरविंद भातांब्रे, बालाजीअप्पा पिंपळे, ओमप्रकाश झुरळे, सोनू डगवाले, रॅम स्वामी, शैलेश स्वामी,संजय रंडाळे, दगडुअप्पा मिटकरी, संजय राजुळे, चंद्रकांत पाचेगावकर, नितीन मोहनाळे, रवि कोरे, विरेश कोरे, एस बी चिलबिले, बसवेश्वर हेंगणे,परमेश्वर खमगे, ad.राजशेखर डिग्गे, ad.अजय कलशेट्टी, ad. निलेश करमुडी, राहुल जवळे, महेश बिडवे, श्रीनिवास मेनकुदळे, शशिकांत बुलबुले, नितीन शेटकार, मनोज राघो,शिवहार वाडकर,संतोष सुलगुडले, नागेश कळसे, संगमेश्वर पानगावे, रवी बिराजदार, योगेश बोरे, अमित खराबे,लक्ष्मण मुखडे, प्रकाश कोरे, राहुल धानुरे, गणेश बिडवे, जयदीप कोरे, बालाजी यशवंतराव पाटील, सौ माधुरी पिंपळे, कल्पना झुरळे, अपर्णा भातांब्रे, विमाल चिलबिले, आरती मुखडे, शीतल देशमुख, अनुराधा राघो, उमा मेनकुदळे, आशा तोडकर, ज्योती सोनटक्के, प्रसाद बेरकिले, विश्वनाथ खोबरे, स्वामी महारुद्र, सचिन खंडागळे, योडेश मुळजे, श्रीनिवास बडूरे, सूरज विभूते, अक्षय बिराजदार, संतोष पाटील, योगेश स्वामी, दयानंद कलशेट्टी आनंद वाडीवाले, काशिनाथ मांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment