आ.डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नाला यश
मुखेड :- तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी आ.डॉ.राठोड यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता यास यश प्रात्प झाले असुन राज्य शासनकडुन केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असुन यात बा-हाळी प्राथमिक आ.केंद्रासाठी ५ कोटी ८० लक्ष तर येवती येथिल प्राथमिक आ.केंद्रासाठी ५ कोटी ३० लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहीती आ.डॉ.तुषार राठोड यांनी दिली.
मुखेड तालुका डोंगराळ भागाणी वेढला आहे, तसेच या तालुक्याचे क्षेत्रफळ इतर तालुक्याच्या तुलनेत जास्त आहे, या भागात पुर्वी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र होते मागील आघाडी शासनाच्या काळात बेटमोगरा व येवती येथे नव्याने दोन प्राथमिकआरोग्य केद्रास मंजुरी मिळवुन घेण्यात यश मिळविले होते मात्र जागे अभावी हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस शासनाकडुन निधी प्राप्त होत नव्हते, तसेच तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन ओळखले जानारे मुक्रामाबाद येथील व बा-हाळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या यासाठी मुक्रामाबाद येथिल प्रा.आ.केंद्राच्या इमारतीसाठी ४ कोटी ६० लक्ष रूपयांच्या निधी आ.डॉ.राठोड यांनी मिळवुन दिला होता ती इमारत आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे तर बा-हाळी व येवती प्रा.आ.केंद्राच्या इमारत बांधकामासाठी निधी दयावा अशी मागणी गावक-यांची होती या मागणीचा पाठपुरावाआ.डॉ.राठोड यांनी शासन दरबारी केला होता यात यश प्राप्त झाले असुन राज्य शासनाकडुन केद्र शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानंतर राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियाण या योजनेतुन बा-हाळी व येवती प्राथमिक आरेग्य केंद्राच्या इमारतीसाठी अनुक्रमे ५ कोटी ८० लक्ष रूपये व ५ कोटी ३० लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहीती आ.डॉ.राठोड यांनी दिली.
हा निधी प्राप्त होण्यासाठी राज्याचे आरोग्य सहसचिव व तालुक्याचे भुमिपुत्र डॉ.सतिष पवार यांचेही प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसुन येते प्राप्त झालेल्या निधीतुन आरोग्य केंद्राची इमारत व डॉक्टर व कर्मचा-यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहेत तसेच कंधार तालुक्यातील व मुखेड मतदार संघातील अंबुलगा (गवुळ) येथे ही मागील आघाडी शासनात प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली होती मात्र या इमारतीसाठी लागणारी तिन एकर जागा उपलब्ध होत नव्हती मात्र गावक-यांनी आता तिन एकर जागा उपलब्ध केली आहे या इमारतीस निधी मिळावा यासाठी आपण राज्य शासनाकडे मागणी केली असुन आगामी पुरवणी अर्थसंकल्पात त्यास मंजुरी मिळेल असा विश्वास आ.डॉ.राठोड यांनी व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल जाजु, रिपाई जिल्हाध्यक्ष गौतम काळे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत गरूडकर, विजय कोत्तापले,गोविंध घोगरे, हणमंत मस्कले, सदाशिव पाटील चिवळीकर, शिवाजीराठोड यांच्या सह अनेकजण उपस्थित हेते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment