बीड /प्रतिनिधी :केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामे गतीने राबविण्यात येत आहेत . बीड जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. यामुळे लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा भाजपा जिंकेल . आपण त्या निवडून आणू असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
बीड जिल्हयातील भाजपचे सर्व आमदार, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, बुथ विस्तारक, शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठक आज चंपावती लाॅन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना श्रीमती पंकजाताई मुंडे बोलत होत्या. या बैठकीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आ सुरेश धस ,आ भीमराव धोंडे, आ .आर टी देशमुख,आ लक्ष्मण पवार, आ संगीता ठोंबरे,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.भागवत कराड,बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे,जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार,भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,रमेश आडसकर,जयश्री मुंडे, आदींसह जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यात रेल्वेसह रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरापासून गावपातळीपर्यंत विकास कामांचा सपाटा सुरू आहे .यामुळे शहर व ग्रामीण भागातील जनता भाजपाच्या पाठीशी उभी आहे .यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा भाजपा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत सर्व बुथ यंत्रणेचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला . आगामी निवडणुका जिंकण्याच्या उद्देशानेच सर्वांनी काम करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
No comments:
Post a Comment