निलंगा, [प्रतिनिधी] लिंगायत समाजाला स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी ता. 13 रोजी महीलांच्या नेतृत्वाखाली ' ईष्टलिंगपूजा आंदोलन करण्यात आले.
त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, लिंगायत ही जात नव्हे तर तो एक वैज्ञानिक स्वतंत्र, परिपूर्ण अवैदीक धर्म असून ह्या लिंगवंत म्हणजेच लिंगायत या धर्माची स्थापना बाराव्या शतकात अनुभव मंडपात महात्मा बसवण्णा यांनी केली आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी व या मागणीची केंद्राकडे शिफारस करावी, लिंगायत धर्मियाना प्रत्येक राज्यामध्ये व राष्ट्रीय स्तरावर धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे, राष्ट्रीय व राज्यपातळीवर महात्मा बस्वेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, आगामी जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद घ्यावी, धर्माच्या मुळ कन्नड भाषेतील वचन साहीत्याचे अनुवाद मराठीत करावे, गाव तेथे लिंगायत स्मशानभुमी व अनुभव मंडपासाठी जमिन उपलब्ध करून द्यावी, विध्यार्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह व आभ्यासक्रम सुरू करावे यासह आदी मागण्याचे निवेदन आंदोलनकर्तेनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी शोभा सलगरे, शिवकन्या राजूरे, निर्मला सोरडे, वैशाली व्हंताळे, जगदेवी मंठाळे, विजयमाला सोरडे, विमल सोरडे, ऐश्वर्या फुलारी, शरणम्मा बिराजदार, शितल चाकोते, अनिता कुडूंबले, शिला निला, नंदा मुळे, महादेवी रेशमे, रत्नमाला गताटे, शिल्पा गताटे. यासह आदीच्या स्वाक्षरी आहेत.यावेळी जि, प ,माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रम अभय साळुंके यांनी पाठींबा दिला
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment