हिंगोली / प्रतिनिधी
भाजपा नेते रामरतन शिंदे यांना नांदेड येथे एका विशेष कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संत नामदेव सामाजिक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
भाजपा नेते रामरतन शिंदे राजकारणाला समाज कारणाची जोड देत सर्व सामान्यांसाठी नेहमीच धावून येतात. त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सर्कल व इतर ठिकाणीही अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत अध्यात्मिक वसा जोपासण्याचे काम त्यांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून हाती घेतले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींचे किर्तनही त्यांनी आयोजित केले होेते. एकंदरीत त्यांच्या सर्वच सामाजिक कार्याची दखल घेत रामरतन शिंदे यांना अखिल भारतीय झुंजारवादी साहित्य संमेलन व गोदावरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील एका विशेष कार्यक्रमात 2018 चा मानाचा समजला जाणारा संत नामदेव सामाजिक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह डॉ. सय्यद जब्बार पटेल, स्वागत अध्यक्ष प्रा. डॉ. आबासाहेब कल्याणकर आदींची उपस्थिती होती. शिंदे यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment