एका दिवसात १०६ बळी ८ हजार कोटींचे नुकसान
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत ३२४ बळी गेले असून एकाच दिवसात १०६ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत . ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत.
१०० वर्षात पडला नाही एवढा पाऊस केरळमध्ये पडला आहे .त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची मदत जाहीर केली. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.
स्टेट बँकेनेही केरळवासियांना दिलासा दिला असून दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. बँक आॅफ केरळच्या खातेदारांना सेवा शुल्क आणि इतर दंड माफ करण्यात येणार आहे.
तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या व नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा
तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment