पुणे :दोन वर्षापुर्वी दुष्काळात लातुरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता .आता तसाच पाणीपुरवठा केरळला केला जाणार आहे . पुरामुळे केरळमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही .या कठीण प्रसंगात महाराष्ट्र केरळच्या मदतीला धावला असुन आज वॉटर एक्सप्रेस केरळला रवाना होत आहे .
केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहेत . एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाईल.
केरळ राज्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेनेही हातभार लावला आहे. रेल्वे कडून ठिकठिकाणाहून केरळला पिण्याचे पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातूनही आज ७ लाख लिटर पाणी रेल्वेने पाठविले जाणार आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेच्या १४ टँक वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी भरण्याचे काम पूर्ण झाले . रेल्वेकडे उपलब्ध असलेले तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आणलेले पाणी वॅगनमध्ये भरले आहे. एका वॅगनमध्ये सुमारे ५० हजार लिटर पाणी भरले जाते

No comments:
Post a Comment