लातूर दि
लातूर ते बार्शी टेंभुर्णी हा लातूर, उस्मानाबाद,बीड नांदेड आदी जिल्ह्यातील नागरिकांना पुणे मुंबई येथे जाणे-येणे साठी अत्यंत जवळचा व अवजड वहानाची सतत वर्दळ असलेला दोन विभागास जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेली खड्डे व रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर वहाने सरळ पास होत नाहीत व खड्ड्यांमुळे रस्ता वहातुकीस गैरसोयीचा झाला असून अरुंद असल्याने सदर रस्त्याची रूंदिकरणासह सुधारणा करून रस्ता वहातुकीस योग्य दर्जाचा करण्याबाबत आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी आज पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर महोदय, मा ना श्री नितीनजी गडकरी यांचे सचिव श्री सुधीर देऊळगावकर व MSRDC विभाग पुणे येथील कार्यकारी अभियंता याच्याशी संपर्क करुन मागणी केली.
सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित झाला आहे परंतु तो महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही,सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावा व चार पदरी रस्ता काम तातडीने करण्यात यावा अशी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी विधानसभेत लक्षवेधी व तारांकित प्रश्र्न उपस्थित करुन मागणी केली होती.
सदर रस्ता एकुण १६५.८०० किमी लांबीच्या आहे, यापैकी ९८.८०० किमी लांबी सोलापूर,३२.७० किमी लांबी लातूर जिल्ह्यात तर ३४.३०किमी लांबी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.बार्शी जवळील असलेला रस्त्याची चाळण झाली असून रस्ता क्षतीग्रस्त आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत व या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा महामार्ग विभागाकडून तातडीने करून घेण्यासाठी मी वयक्तीक लक्ष घालून काम करण्याचे आश्वासन बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उत्तरात दिले आहे.परंतु सदर आश्वासन पुर्तता अदयापही प्रलंबीत राहीली.
भुसंपादनाची कार्यवाही व निधी अभावी या कामासाठी विलंब लागत असल्याने सदर रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी वयक्तीक लक्ष देण्याचे व संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सुचनाही केल्याचे सचिव सुधीर भाऊ देऊळगावकर यांनी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना कळविले आहे.हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरून जाणारी मोठ्या प्रमाणावरील वहातुक सोलापूर मार्गे होत असुन वहातुकीस हे अंतर जास्तीचे वाढले आहे व सदर रस्त्याचे सुधारणा काम झाल्यास नागपूर पुणे, मुंबई जाणार्या वहानाना व प्रवाशांना अंतर कमी होणार असून सोयीचे होणार असल्याचे आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी निदर्शनास आणून दिले.व सदर रस्ता रुंदीकरण व सुधारणा काम तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा
तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment