महाराष्ट्राकडून केरळसाठी २० कोटींची मदत

Saturday, August 18, 2018

मुंबई: 
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळला केंद्र सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनं तातडीने २० कोटींची मदत जाहीर केली आहे. या शिवाय केरळला अन्न पुरवठ्यासह इतर आवश्यक साधनसामुग्रीही पुरवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. 
. केरळच्या घराघरात पाणी घुसल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह इतर राज्यांनी केरळसाठी मदतीचा हात पुढे केला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे केरळची वाताहात झाली आहे


केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा तातडीने करण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. एमसीएचआय–क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किंमतीचे अन्न उपलब्ध करून देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून ५१ लाख आणि जितो इंटरनॅशनलकडूनदेखील ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एकूण ११ टन अन्न आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले असून पैकी ६ टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत केरळला रवाना होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ही मदत जाहीर केली आहे. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी केरळला मदत करण्याकरीता एका पथकाची स्थापना करण्यात आली. 


No comments:

Post a Comment