भाजपा ओबीसी मराठवाडा उपाध्यक्षपदी बायस

Thursday, August 30, 2018



लातूर /प्रतिनिधी : भाजपा ओबीसी मोर्चाच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी पृथ्वीसिंह बायस यांची नियुक्ती करण्यात आली . पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बायस यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .

या प्रसंगी खा.सुनिल गायकवाड ,भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी,प्रदेश सरचिटणीस देविदास काळे,अजय भोळे,शहराध्यक्ष शैलेश लाहोटी,महापौर सुरेश पवार,जि.प.सदस्य व्यंकटराव तेलंग,ग्रामीण ओबीसी अध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे,लातुर ओबीसी अध्यक्ष अजय भुमकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.सौ.दिपाताई गिते, दिपक टिंगरे,पद्माकर चिंचोलकर,धनाजीराव सुर्यवंशी,मार्केट कमेटी सदस्य गोविंद नरहारे,महिला जिल्हाअध्यक्षा सौ.बालिकाताई पडिले,सौ ज्योती पुदाले,सौ,सुवर्णा येलाले,कोमल वायचळकर,सरचिटणीस मुन्ना हाशमी,सचिन निलापल्लै यांच्यासह भाजपा ग्रामीण युवा अध्यक्ष श्री.अनिल पुजारी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते या निवडीबद्दल बायस यांचे अभिनंदन होत आहे .

No comments:

Post a Comment